Triyuginarayan Temple (Sanskrit: त्रियुगी-नारायण)

  Triyuginarayan Temple (Sanskrit: त्रियुगी-नारायण) is a Hindu temple located in the Triyuginarayan village in Rudraprayag district, Uttarakhand. The ancient temple is dedicated to god Vishnu. Its fame is credited to the legend of god Shiva’s marriage to goddess Parvati witnessed by Vishnu at this venue and is thus a popular pilgrimage centre.[1][2] A special feature of this temple is a perpetual fire, that burns in front of the temple. The flame is believed to burn from the times of the divine marriage.[3] Thus, the temple is also known as Akhand Dhuni temple.

  According to Hindu mythology, goddess Parvati was daughter of Himavat or Himavan - the personification of the Himalayas. She was the rebirth of Sati, the first wife of Shiva - who sacrificed her life when her father insulted Shiva. Parvati initially tried to allure Shiva by her beauty, but fails. Finally, she won Shiva by practising rigorous penance at Gauri Kund, which is 5 kilometres (3.1 mi) away from Triyuginarayan. Pilgrims visiting Triyuginaryan temple also visit the Gauri Kund temple, dedicated to Parvati, which is the base camp for trek to Kedarnath Temple.[5] Mythology states that Shiva proposed to Parvati at Guptakashi, before they got married in the small Triyuginarayan village at the confluence of Mandakini and Sone-Ganga rivers.[6]

  Triyuginarayan is believed to be the capital of Himavat. It was the venue of the celestial marriage of Shiva and Parvati, during the Satya Yuga, witnessed in the presence of the holy fire that still burns eternally in front of the temple in a Havana-kund or Agni-kund, a four-cornered fireplace on the ground. Vishnu formalized the wedding and acted as Parvati's brother in the ceremonies, while the creator-god Brahma acted as the priest of the wedding, that was witnessed by all the sages of the times. The exact location of the wedding is marked by a stone called Brahma Shila, in front of the temple.[2][7][8] The greatness of this place is also recorded in a sthala-purana (a scripture specific to a pilgrimage centre). According to the scripture, pilgrims who visit this temple consider the ashes from the burning fire as holy and carry it with them.[9] It is also believed that ashes from this fire are supposed to promote conjugal bliss.[1][2]

  Before the marriage ceremony, the gods are believed to have taken bath in three kunds or small ponds namely, Rudra-kund, Vishnu-kund and Brahma-kund. The inflow into the three kunds is from the Saraswati-kund, which - according to legend - originated from Vishnu's navel. Hence, the water of these kunds is considered to cure infertility. The ashes from Havana-kund are supposed to promote conjugal bliss.🙏🏻HARI OM🌺🌸🌼

  ।। सर्वे जन: सुप्रभातम् ।।

  🌞।। सर्वे जन: सुप्रभातम् ।।🌞
           ।। आजची आरती ।।
       ।। दिगंबरा दिगंबरा 
    श्रीपाद वल्लभ दिगंबरा ।।
       💐।। श्री नृसिंह सरस्वती 
     स्वामी महाराज प्रसन्न ।।💐
  भाद्रपद शुद्ध तृतीया (3) दिनांक 24/08/2017  गुरुवार रोजी श्री गुरु पादुकांचे पुजा व मंगलारती आहे. तसेच
        श्री टेंबे स्वामी कृत करुणा त्रिपदी सह श्री गुरुमहाराज पादुकांची पाद्य पुजा व आरती प्रसाद होणार आहे तरी सर्व भाविक भक्त यांना आमंत्रित करीत आहोत. 

  ठिकाण:- श्रीगुरुभक्त अनंत तुळजाराम शामराज, पेशवे हॉस्पिटल जवळ तुळजापूर 

  वेळ सायं 6 वा.पूजा वेळेतच सुरु होईल.  तरी सर्व भाविक भक्त यांनी श्रीदत्तगुरु सेवेचा लाभ घेण्यास आवश्य यावे. नागेशशास्त्री नंदीबुवा.

  मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरचा जगप्रसिद्ध किल्ला.

  मध्य प्रदेशातील ग्वाल्हेरचा जगप्रसिद्ध किल्ला - तटबंदीच्या ईशान्येला एक भग्न मंदिर आहे. 'चतुर्भुज मंदिर' हे त्याचे नाव. गाभाऱ्यात एका संपूर्ण पाषाणातून कोरलेली चतुर्भुज विष्णूची मूर्ती आहे पण मूर्तीची मोडतोड झाल्याने मंदिर वापरात नाही. देवाची पूजा होत नाही की देवासमोर दिवाबत्ती होत नाही. ग्वाल्हेर शहरात रहाणारे लोक तिकडे फिरकतही नाहीत - वास्तुशिल्प व कोरीवकामांचे अनेक चांगले नमुने आहेत शहरात मग काय पहायचे आहे ह्या पडक्या देवळामध्ये?

  ह्या पडक्या देवळात विष्णूच्या मूर्तीच्या उजव्या हाताला एक शिलालेख आहे. आणि हा शिलालेख पहायला जगभरातून विदेशी पर्यटक (विशेषत: गणिती!) येतात. गणिती आणि शिलालेख पहायला? काहीतरी गफलत होतीये. पुरातत्त्वज्ञ म्हणायचे आहे का? नाही! गणिती म्हणजे गणिताचे अभ्यासकच म्हणायचे आहे मला! असं काय आहे त्या शिलालेखात की रुक्ष गणितींना त्यात रस असावा? बघूया आपण. त्या शिलालेखात लिहिलेले आहे की "संवत ९३३ मध्ये माघ शुक्ल द्वितीयेला हे मदिर बांधून पूर्ण झाले. [कोणी एक] अला नावाच्या व्यक्तीने दररोज ५० हार देवाला मिळावेत म्हणून २७० हात लांब आणि १८३ हात रुंद जमीन मंदिराला दान दिली" वगैरे.

  आता तुम्ही म्हणाल - ह्यात काय आलंय खास? काय घेणं देणं आहे आपल्याला आणि गणितींना ह्या पडक्या मंदिरातल्या शिलालेखाशी आणि त्यासाठी मिळालेल्या ह्या जमिनीशी? जर मंदिरच वापरात नाहीये तर मग काय फरक पडतोय देवाला हार मिळत आहेत की नाहीत [आणि ती जमीन सध्या कोणी हडप केलीये!]. बरोबर आहे ना? अजिब्बात नाही - पुन्हा एकदा तो शिलालेख वाचा.

   ह्या शिलालेखाची खासियत म्हणजे जगातले पहिले - होय - जगातील पहिले - लिखित शून्य (०) ह्या शिलालेखात आहे! ह्या शिलालेखाची अजून एक खासियत म्हणजे लिहिलेले सर्व आकडे दशमान पद्धतीने (जी आपण सध्या सर्रास वापरतो) लिहिलेले आहेत. संवत ९३३ म्हणजे इ स ८७६ मध्ये लिहिलेला हा शिलालेख आहे. ह्या शिलालेखातून सिद्ध होते की भारतात दशमान पद्धत (एकक - दशक - शतक इत्यादी) आणि शून्याचा उपयोग कमीतकमी अकराशे वर्षांपासून प्रचलित होता. 

  शून्य ह्याचा संस्कृतमध्ये अर्थ होतो 'काही नाही' अथवा 'रिकामे'. अरबांनी ह्याला 'झीफर' म्हटले. अरबी शब्द 'सीफारा' म्हणजे 'रिकामे असणे' ह्यावरून 'झीफर' हा शब्द त्यांनी योजला. युरोपमध्ये शून्य ही संकल्पना पोहोचायला तब्बल सतरावे शतक उजाडावे लागले. तोपर्यंत ते अशास्त्रीय आणि कीचकट रोमन आकड्यांची पद्धत ( I, II, III, IV...X इत्यादी) वापरत होते. लॅटीनमध्ये हे अरबी झीफर 'झेफरीयम' म्हणून आले - पुढे फ्रेंचमध्ये त्याचे 'झेरो' झाले आणि त्यातून इंग्रजी 'झीरो'. अजूनही बरेचदा इंग्रजीत शून्याला 'नॉट' (nought) म्हटले जाते आणि ह्या नॉटचा अर्थ पण मूळ संस्कृत शब्दानुसार 'रिकामा' असाच आहे!

  चतुर्भुज मंदिरातील हा शिलालेख शोधण्याचे श्रेय सर अलेक्झांडर कनिंगहमला जाते. हा माणूस आर्कीओलॉजीकल सर्वे ऑफ इंडियाचा संस्थापक होता. भारतभर फिरून त्याने त्याचे रिपोर्ट लिहिले ज्यामधून जगाला भारतातील पुरातत्त्व खजिन्याची ओळख झाली. त्याच्या 'Four reports made during the years 1862-63-64-65' (खंड २ - भाग १६)  मध्ये ह्या मंदिराचा उल्लेख आहे. १८७१ मध्ये त्याचे हे पुस्तक प्रकाशित झाले आणि शून्याचा जनक भारत होता ह्यावर शिक्कामोर्तब झाले. तेव्हापासून (आपल्याला माहित नसते पण) जगभरातले गणिती हेच आद्य शून्य बघायला ग्वाल्हेरला चतुर्भुज मंदिरात जातात!

  - संकेत कुलकर्णी (लंडन)

  चतुर्भुज मंदिर - शिलालेख - "९३३" - "२७०" - "१८३" - "५०"

  ।।जय कपालेश्वर।।

  ।।जय कपालेश्वर।।
  नंदी नसलेले कपालेश्वर मंदिर 
  नाशिकमध्ये पंचवटीत गोदावरी नदीच्या काठी एका उंच टेकडीवर कपालेश्वर मंदिर वसले आहे. कपालेश्वर म्हणजे
  महादेव. प्रत्यक्ष शंकराने येथे वास केल्याचा उल्लेख आख्यायिकांमध्ये आढळतो. या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे हे
  देशातील पहिलेच मंदिर असावे, जेथे शंकरासमोर नंदी नाही.
  येथे नंदी का नाही याचीही पुराणात एक कथा आहे. एकदा इंद्रसभा भरली होती.
  त्यावेळी सर्व देव सभेस उपस्थित होते. त्यावेळेस ब्रह्मदेव व महेश (शंकर) यात
  वादविवाद झाला. त्यावेळी पाच तोंडे असणार्या ब्रह्मदेवाची चार तोंडे वेद
  म्हणत तर पाचवे तोंड निंदा करीत असे. संतापलेल्या शंकराने ब्रह्मदेवाचे ते निंदणारे
  तोंड उडवले. ते तोंड शंकराच्या हाताला चिकटून बसले. त्यामुळे शंकराला ब्रह्महत्येचे
  पातक लागले. त्या पापापासून मुक्तता मिळवण्यासाठी शंकर ब्रह्मांडभर फिरत
  होते. एकदा सोमेश्वर येथे बसले असता, समोरच एक गाय व तिचा गोर्हा (नंदी)
  एका ब्राह्मणाच्या दारात उभा होता. त्यांच्या संवादात गोर्हा म्हणाला की,
  ' मी नाकात वेसण घालणार नाही, उद्या तो ब्राम्हण मला वेसण
  घालायला आल्यावर मी त्याला मारणार'. त्यावर त्याच्या आईने (गायीने) त्यास म्हटले, ' तू हे जर केलेस तर
  तुला एका ब्राह्मणाला मारल्याचे म्हणजेच ब्रह्महत्येचे पातक लागेल'. त्यावर तो नंदी म्हणाला,
  'मला त्यावरचा उपाय माहीत आहे.' दुसर्या दिवशी ब्राह्मण गोर्ह्यास वेसण घालायला आला असताना, नंदीने
  त्याला शिंगाने हुसकले. त्यात त्या ब्राह्मणाला मृत्यू आला आणि नंदीचे शरीर काळे ठिक्कर पडले. आता पुढे
  काय होतेय हे उत्सुकतेने पाहत शंकर त्या नंदीच्या मागे जाऊ लागला. त्यानंतर त्या नदीने
  गोदावरीच्या पात्रातील (रामकुंडात) त्रिवेणी संगमावर येऊन स्नान केले. त्याबरोबर त्याचा मूळ शुभ्र रंग
  त्याला परत मिळाला.
  ते पाहून शंकरानेही त्या त्रिवेणी संगमात स्नान केले. त्याबरोबर मागे लागलेल्या मस्तकापासून भगवान
  शंकराची सुटका झाली. त्याच गोदावरी काठावर एक मोठी टेकडी होती. त्या टेकडीच्या कपारात शंकर
  जाऊन बसले असता नंदीही तेथे आला. त्यावर 'तुझ्यामुळे माझी ब्रह्महत्येतून सुटका झाली, त्यामुळे यापुढे तू
  माझ्यासमोर बसू नकोस तू माझ्या गुरुसमान आहेस' असे शंकराने नंदीस सांगितले.
  त्यामुळे शंकराच्या या मंदिरात नंदी नाही. जगातील हे असे एकमेव मंदिर आहे. तो नंदी रामकुंडात
  (गोदावरीतच) विसावला आहे, असेही मानले जाते. त्यावेळी शंकराने नंदीला सांगितल्यानुसार 12
  ज्योर्तिलिंगानंतर 'कपालेश्वर' मंदिराचे महत्त्व आहे, असे सांगितले जाते.
  हे मंदिर टेकडीवर आहे. आता आजूबाजूला वस्ती झाली आहे.
  गावाच्या मध्यवर्ती भागात हे मंदिर आहे. पूर्वी येथे फक्त पिंड होती. पण
  पेशव्यांच्या काळात या मंदिराचा जीर्णोद्धार झाला आणि आजचे स्वरूप
  त्याला मिळाले. या मंदिराच्या पायर्या उतरून खाली आले की समोर
  गोदावरी नदी आहे. तेथेच प्रसिद्ध रामकुंड आहे. याच रामकुंडात भगवान रामाने
  आपल्या पित्याचे श्राद्ध केले होते. येथे इतरही बरीच मंदिरे आहेत.
  कपालेश्वर मंदिराच्या समोरच गोदावरी नदीच्या पलीकडे प्राचीन सुंदर नारायण
  मंदिर आहे. हरिहर भेट महोत्सवाच्या वेळी कपालेश्वर व सुंदर नारायण
  या दोन्ही मंदिरातून अनुक्रमे शंकर व विष्णू या दोघांचे मुखवटे गोदावरी नदीवर
  आणले जातात. व त्यांची भेट घडवली जाते. तेथे त्यांच्यावर अभिषेक करण्यात येतो. यानिमित्ताने मोठा उत्सव
  होतो. याशिवाय कपालेश्वर मंदिरात महाशिवरात्रीला मोठा उत्सव असतो.
  श्रावणी सोमवारीही या मंदिरात मोठी गर्दी असते. 
  जय भोले

  दत्तश्रीगुरूंचे करुया ध्यान वंदू चरण प्रेमभावे

  दत्तश्रीगुरूंचे करुया ध्यान वंदू चरण प्रेमभावे.
  ब्रह्मा विष्णू महेश एकत्र आले
  मन हे न्हाले भक्ती डोही.
  अनुसया उदरी धन्य अवतार
  केलासे उद्धार विश्वाचा या.
  माहुरगडावरी सदा कदा वास
  दर्शन भक्तास देई सदा चैतन्य झोळी
  विराजे काखेत गाईच्या सेवेत मन रमे.
  चोविस गुरूचा ल‍ावियला शोध
  घेतलासे बोध विविधगुणी.

  श्रीदत्तस्मरणं

  सर्वसंगपरीत्यक्तं सर्वशक्तिसमन्वितः श्री दत्तराजं अहं भजेत् । करूणासागर दिनानाथं कारूण्यपुरीतः श्री दत्तराजं अहं भजेत् । त्रिगुणात्मक जगतगुरूं त्रैमुर्तीनाथः श्री दत्तराजं अहं भजेत् । 🌻🌻🌻🙏 श्रीदत्तस्मरणं

  श्रीतुलजापुरवासिनीस्तोत्रम्

  *श्रीतुलजापुरवासिनीस्तोत्रम्* नमोsस्तु ते महादेवि शिवे कल्याणि शांभवि|| प्रसीद वेदविनुते जगदंब नमोsस्तु ते||१|| जगतामादिभूता त्वं जगत्वं जगदाश्रया|| एकाsप्यनेकरुपासि जगदंब नमोsस्तु ते||२|| सृष्टिस्थितिविनाशानां हेतुभुते मुनिस्तुते|| प्रसीद देवविनुते जगदंब नमोsस्तु ते||३|| सर्वेश्वरि नमस्तुभ्यं सर्वसौभाग्यदायिनि|| सर्वशक्तियुतेsनंते जगदंब नमोsस्तु ते||४|| विविधारिष्टशमनि त्रिविधोत्पातनाशिनि|| प्रसीद देवि ललिते जगदंब नमोsस्तु ते||५|| प्रसीद करुणासिंधो त्वत्त: कारुणिका परा|| यतो नास्ति महादेवि जगदंब नमोsस्तु ते||६|| शत्रून्जहि जयं देहि सर्वान्कामांश्च देहि मे|| भयं नाशय रोगांश्च जगदंब नमोsस्तु ते||७|| जगदंब नमोsस्तु ते हिते जय शंभोर्दयिते महामते|| कुलदेवि नमोsस्तु ते सदा हृदि मे तिष्ठ यतोsसि सर्वदा||८|| तुलजापुरवासिन्या देव्या: स्तोत्रमिदं परम्|| य:पठेत्प्रयतो भक्त्या सर्वान्कामान्स आप्नुयात्||९|| *इति श्री.प.प.श्रीवासुदेवानंदसरस्वतीविरचितं श्रीतुलजापुरवासिन्या देव्या: स्तोत्रं संपूर्णम्*