दत्तश्रीगुरूंचे करुया ध्यान वंदू चरण प्रेमभावे

दत्तश्रीगुरूंचे करुया ध्यान वंदू चरण प्रेमभावे.
ब्रह्मा विष्णू महेश एकत्र आले
मन हे न्हाले भक्ती डोही.
अनुसया उदरी धन्य अवतार
केलासे उद्धार विश्वाचा या.
माहुरगडावरी सदा कदा वास
दर्शन भक्तास देई सदा चैतन्य झोळी
विराजे काखेत गाईच्या सेवेत मन रमे.
चोविस गुरूचा ल‍ावियला शोध
घेतलासे बोध विविधगुणी.